शेत शिवारात बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ #chandrapur #sindewahi #Leopard #dead

Bhairav Diwase

Leopard, chandrapur, sindewahi

सिंदेवाही:- सिंदेवाही (Sindewahi) तालुक्यात गुंजेवाही (Gunjewahi) मार्गावरील पवनपार समोरील कन्हाळगाव येथे रविवार दिनांक 20 नोव्हेंबर सकाळी दहा वाजताचा सुमारास जंगल परिसरामध्यील शेत शिवाराच्या रस्त्यालगत बिबट्या leopard मृत Dead अवस्थेत आढळून आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, सिंदेवाही तालुक्यातील पवनपार समोरील कन्हाळगाव शेत परीसरातील वनक्षेत्र रस्त्यालगत नर जातीचा अंदाजे तीन वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. या मृत बिबट्याची माहिती उपस्थितांनी जवळील सिंदेवाही वन विभागाला कळविली.

माहिती मिळताच येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सालकर यांनी आपल्याकडे असलेले आर.आर. यु. पथक तसेच वन सहाय्यक यांना ताबडतोब घटनास्थळी बोलावले तसेच स्वतः हजर होत.

सदर घटनेच्या पंचनामा केला. मृत बिबट्याचे सर्व अवयव साबुत असून डॉ. विनोद सुरपाम पशुधन विकास अधिकारी सिंदेवाही हे बिबट्याचे शवविच्छेदन केले असल्याची माहीती देण्यात आली. शवविच्छेदन अहवालानंतर बिबट्याचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट होणार आहे.