देशी बनावटीची पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे जप्त #chandrapur #warora

Bhairav Diwase
0


वरोरा:- वरोरा शहरातील रत्नमाला चौकात नाकाबंदी केली होती, त्यावेळी संशयित बलेनो चारचाकी वाहन क्रमांक MH 34 BR 8593 ला पोलिसांनी चौकशीसाठी थांबविले असता वाहनातून देशी बनावटीची पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

या प्रकरणी पुनमचंद येलय्या मारकरी (34) व अभिलाष ओंदेलू पंचल (30) दोघे माजरी येथील रहिवासी असून या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी ती पिस्टल कोणत्या उद्देशाने आणली याबाबत वरोरा पोलीस तपास करीत आहेत. दोन्ही आरोपींकडून एकूण 5 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर यशस्वी कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी, सपोनि राजकीरण मडावी, गुरनुले, जुमडे, अनिल बैठा, प्रवीण निकोडे यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)