Click Here...👇👇👇

अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल #chandrapur #Amrawati

Bhairav Diwase


चंद्रपूर:- समाजमाध्यमावर ओळख झाल्यानंतर तरूणीकडून अश्लील छायाचित्र मागितल्यानंतर तिला शरीरसंबंधासाठी तगादा लावणऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील युवकांविरूध्द अमरावती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन पाटील (रा. बल्लारपूर, जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे.

इन्स्टाग्राम वर ओळख झालेल्या एका तरुणाला खासगी छायाचित्र पाठवणे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणीला चांगलेच महाग पडले आहे. या मैत्रिणीची विवस्त्रावस्थेतील छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन या तरुणाने पीडित विद्यार्थिनीचा छळ चालवला होता. त्याने तिच्याकडे शरीरसंबंधासाठी तगादा लावला होता. अखेर पीडितेने सायबर पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांनी आरोपीच्या विरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.