दोन संस्थाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण चंद्रपूरकरांसाठी अनमोल भेट:- हंसराज अहीर #chandrapur


हिमोग्लोबिनोपॅथी अनुसंधान प्रबंधन व नियंत्रण केंद्र तसेच सिपेट इमारतीचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

चंद्रपूर :- चंद्रपूरातील ICMR हिमोग्लोबिनोपॅथी अनुसंधान प्रबंधन व नियंत्रण केंद्र (सिकलसेल सेंटर) तसेच CIPET सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी च्या इमारतीचे लोकार्पण नागपूर येथुन आभासी पध्दतीने केले याचा आनंद असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

सन 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी पांढरकवडा येथे आले असतांना हिमोग्लोबिनोपॅथी अनुसंधान प्रबंधन व नियंत्रण केंद्राच्या (सिकलसेल सेंटर) इमारतीचे भुमिपूजन केले होते. युपीए सरकारच्या राजवटीत हंसराज अहीर यांच्या सतत प्रयत्नांतून या केंद्राला मान्यता प्रदान करण्यात आली होती परंतु निधीअभावी हे काम पुर्णत्वास गेले नव्हते मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीं च्या काळात भरीव निधी उपलब्ध झाल्यानंतर हे काम पुर्णत्वास येवून त्याचे लोकार्पणही मोदीजींच्या शुभहस्ते संपन्न झाले आहे.

सन 2016 मध्ये हंसराज अहीर केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री असतांना त्यांच्या कार्यकाळात चंद्रपूरात सिपेटची उभारणी करण्यात आली होती. 2017 मध्ये वेकोलि दुर्गापूर वर्कशॉप मध्ये हे केंद्र प्रायोगिक सुरु झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे शुभहस्ते या केंद्राच्या इमारतीचे भुमीपूजन केले होते. केंद्र सरकारने सिपेट इमारतीसाठी निधी मंजुर करुन सर्व सोइंनी युक्त ही प्रशस्त इमारत उभारली व दि. 11 डिसेंबर रोजी मोदीजींनी या इमारतीचे लोकार्पण करुन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील जनतेच्या सेवेत सादर केले आहे. चंद्रपूरकरांच्या आनंदात भर घालणारा हा क्षण असून या आनंदात आपण सहभागी असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

सिकलसेल सेंटरमुळे रक्तसंबंधीत विविध आजारावर संशोधन होणार असल्याने सिकलसेलग्रस्त रुग्णांना हे केंद्र तसेच बेरोजगारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होण्यास सिपेट वरदान ठरेल असेही अहीर यांनी या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत