कत्तलखान्यात जाणाऱ्या २८ गुरांची सुटका #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase

एक जण अटकेत, दोघे फरार 



पोंभूर्णा:-  उप पोलिस स्टेशन उमरी पोतदार अंतर्गत येत असलेल्या आंबेधानोरा बस स्टँडवर नाकाबंदी दरम्यान अवैध गोवंश वाहतूक ‌करणारा आयशर गाडी क्र. MH 34 BZ 3509  काही अंतरावर जाऊन थांबवून चालक पळण्याचा प्रयत्न करीत असतांना चालकास ताब्यात घेण्यात आले असून इतर दोन इसम पळून जाण्यात यशस्वी झाले.

   आयशरमध्ये एकूण २४ नग गोवंश जनावरे आणि  चार म्हैस अवैधरित्या बेकायदेशीर वाहतूक करतांना सापडले. त्यांचेकडून २४ गोवंश जनावरे , ४ म्हशी, एक मोबाईल व आयचर गाडी असा  एकूण १३ लक्ष दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
   
     चंद्रशेखर राजलू गादम, मनवर मुख्तार व मासूम अली, यांचे विरुध्द कलम ५ अ, ५ ब,महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सहकलम ११ (१)(ड),  प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     
सदरची कार्यवाही ठाणेदार किशोर शेरकी, सहाय्यक फौजदार सूर्यकांत तोडकर, संजय ठेंगणे, अजय गुरूनुले, संदीप चुदरी, सुनील तायडे, राकेश खैरे यांनी केली असून पुढील तपास साईनाथ पिपरे करीत आहेत.