चंद्रपूरात अट्टल मोटारसायकल चोर अटकेत #chandrapur #arrested #thiefचंद्रपूर:- चंद्रपूर शहरात मागील काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. मोटारसायकलची चोरी करणा-या एका अट्टल चोराला शहर गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.

रोज तक्रारी येत असल्याने पोलिसांनी दुचाकी चोरट्यांविरुद्ध मोहीम तीव्र करून चोरट्यांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे. शहर गुन्हे शोध पथकाने अट्टल दुचाकी चोरटा अजय उर्फ भूषण शालीग्राम याला महाकाली मंदिर परिसरातून अटक केली. त्याच्याकडून दुचाकी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून, आरोपी अजय कडून चोरीच्या 5 दुचाकी जप्त करीत एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची यशस्वी मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार व पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शरीफ शेख, महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, जयंता चुनारकर, चेतन गजलवार, सचिन बोरकर, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, रुपेश रणदिवे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या