चप्पल घालून मंदिरात गेलेला मद्यपी थेट कोठडीत #chandrapur #arrested

Bhairav Diwase


चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील हनुमान खिडकीजवळील हनुमान मंदिराची स्वच्छता सुरू असताना एक मद्यपी इसमाने पायात चप्पल घालून मंदिरात प्रवेश केला. तसेच संचालकांशी वादही घातल्याची शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी संचालकाच्या तक्रारीवरून इमाम नामक व्यक्तीवर कलम २९४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी विसापूर परिसरातील हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केल्याची घटना घडली होती. शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास मंदिर संचालक व हिंदू भक्त मंदिराची साफसफाई करीत होते. दरम्यान इमाम नामक व्यक्ती मद्य प्राशन करून, पायात चप्पल घालून मंदिरात प्रवेश केला.

मंदिरात सफाई करणाऱ्या गौरेश साठोठे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. यावेळी तेथील भक्तांनी त्याची समजूत घालून परत पाठवले. परंतु, काही वेळाने इमाम परत आला. मंदिर संचालकांची पुन्हा शिवीगाळ केली. तसेच मारून टाकण्याची धमकी दिली. दरम्यान मंदिर संचालकांनी शहर पोलिस स्टेशन गाठून गुन्हा नोंदविला. पोलिसांनी कलम २९४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून इमामला अटक केली.

मंदिर संरक्षित आहेत का?

मागील पंधरवाड्यापूर्वी विसापूर येथील हनुमान मंदिरातील मूर्तीची तोडफोड करून विटबंना करण्यात आली होती. आता हनुमान खिड़की परिसरात असा प्रकार घडल्याने मंदिर सुरक्षित आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.