दारू पिण्यासाठी नकार दिला म्हणून काढली तलवार! #Chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase

पोलिसांनी तलवारीसह चुलत भावाला केली अटक


भद्रावती:- दारू प्यायला दे..! असा हट्ट घालणारे हजारो लोकं मिळतील. पण, दारू पाजण्यासाठी हट्ट करणारे कमीच असतात.. चंद्रपुरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी नकार दिल्याने एकावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.

दारू पिण्यासाठी भावाने चुलत भावाला हट्ट केला. चुलत भावाने नकार दिला. पण भावाने नकार दिल्याने त्याचा राग अनावर झाला आणि त्याने थेट तलवारच काढली. भावाने तलवार उगारताच प्रकरण थेट पोलिसात गेलं आहे. पोलिसांनी चुलत भावाला अटक केली आहे. हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडला. या हट्टखोर भावाची चर्चा जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील भद्रावती गवराळा येथील नागोबा बदखल याच्याकडे घरगुती कार्यक्रम होता. याकरिता नातेवाईकांना बोलाविले होते. गवराळा येथील त्याचा चुलत भाऊ प्रशांत बदखल हा सुद्धा आला होता. या कार्यक्रमात त्याने चुलत भाऊ नागोबा याला दारू पिण्यासाठी हट्ट केला. मात्र नागोबाने दारू पिण्यास नकार दिला. वारंवार बोलावूनही तो दारू पिण्यासाठी येत नाही म्हणून दोघांत वाद झाला. यावरून प्रशांतने घरी जाऊन तलवार काढली. यामुळे सर्व नागरिक भयभीत झाले व भद्रावती पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तलवारीसह आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास पोलीस करीत आहे.