स्विट न मिळाल्याचा वाद गेला विकोपाला, अनं लग्नात झाली हाणामारी #chandrapur #chimur

Bhairav Diwase
सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल


चिमूर:- दिनांक 18/12/2022 रोजी मिलन लॉनमध्ये वडाळा (पैकु) येथील प्रदिप यशवंतराव जाधव यांच्या मुलीचे लग्न होते. याकरीता क्वालेटी अन्नपुर्णा कॅटर्स चिमुर यांच्याकडे जेवणाचा आर्डर देण्यात आला होता. सायंकाळी 04/30 वाजताचे सुमारास वर पक्षाकडील शेवटची मानवाईक पंगत सुरु असतांना कॅटर्स वाल्यांकडुन स्विट न वाढल्याचे कारणावरुन वाद निर्माण होऊन कॅटर्समध्ये काम करणारे तसेच वर पक्षाकडील पाहुण्यांमध्ये हाणामारी झाली. हाणामारीमध्ये दोन्ही पक्षाकडील लोकांनी लग्नाकरीता असलेले प्लॉस्टीक खुर्च्या, भांडे व ईतर साहित्य इकडे-तिकडे फेकुन मारल्याने दोन्ही पक्षाकडील काही ईसम किरकोळ जखमी झाले.

सदर दिवशी चिमुर तालुक्यातील आमडी (बेगडे), रेंगाबोडी, सोनेगांव (वन) येथे ग्राम पंचायत निवडणुक असल्याने पोलीस स्टेशन चिमुर येथील मनुष्यबळ निवडणुक कर्तव्यावर होते.

घटनेची माहिती मिळताच पोलास हवालदार मोहन धनोरे व पोलीस नाईक कैलास आलाम हे तात्काळ मिलन लॉन येथे पोहचुन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेच पोलीस निरीक्षक मनोज गभने हे घटनास्थळ पोहचुन परिस्थितीवर नियत्रंण मिळविले.

सदर घटनेसंबंधाने फिर्यादी गौरव देविदास मोहिनकर रा. चिमुर यांच्या तक्रारीवरुन पो.स्टे. चिमुर येथे गैरकायदयाची मंडळी गोळा करुन जखमी केल्याचे विविध कलमान्वये मौजा सेलु जि. वर्धा येथील एकुण 7 इसमाविरुध्द भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुशिलकुमार सोनवाने हे गुन्हयाचा पुढील तपास करीत आहेत.


पो. स्टे. चिमूर येथील संपुर्ण मनुष्यबळ ग्राम पंचायत निवडणुकीत व्यस्त असल्याने तरी सुध्दा अल्प मनुष्य बळ घटनेची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी पोहचून त्वरित होत असलेली हाणामारी नियंत्रणात आणून संभाव्य फार मोठी घटना टाळण्यात आली.
मनोज गभने, पोलीस निरीक्षक चिमूर