Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

गाडगेबाबा स्वछता संस्कृतीचे जनक:- सुरज तलांडे #chandrapur #Korpana(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- दि. 20 डिसेंबरला प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गड़चांदुर येथे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील विद्यार्थ्याने स्वयंपूर्तीने केले असून सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नेहा लांडे हीने केले व कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यलयतिल प्राध्यापिका कु. रेणु गनफाड़े यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यलयतिल कार्यशील कर्मचारी सूरज देवराव तलांडे यांनी भूषविले व त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संत गाडगे बाबा यांच्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात महाविद्यलयचे विद्यार्थिप्रिय प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संत गाडगे बाबा चे कार्य व स्वछतेचा संदेश समजून सांगितले तसेच सदर कार्यक्रमात महाविद्यलयातील प्राध्यापक इजाज शेख व प्राध्यापिका कु. मनीषा मरस्कोल्हे प्रा. पंकज देरकर यांनी आपली उपस्थिति दर्शवीली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. रुपाली टेकाम हिने केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत