राजुरा:- राजुरा तालुक्यातील सुमठाणा येथे बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता सुमारास गोठ्याला आग लागून जनावरे गंभीर जखमी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
सुमठाणा येथे धनराज देवाळकर यांच्या गोठ्याला बुधवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले. काही वेळानी नगर पालिका येथील अग्निशमन वाहनाच्या साहाय्याने आग विझविण्यासाठी मदत मिळाली. या भीषण आगीत बैलजोडी, गाय गंभीर जखमी झाली. तसेच कार व कोंबड्या जळाले.
दरम्यान आग कशाने लागली हे समजू शकले नाही. या आगीत प्राणहानी टाळली असली तरी ऐन शेतीच्या हंगामात बैलाची जोडी गंभीर जखमी झाल्याने शेतकरी संकटात अडकला आहे. शासनाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत