तो तरुणावर चाकूनं सपासप वार करत होता, लोक मात्र बघतच होते #chandrapur #Korpana #Gadchandur #knife #attack(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर शहरातील महात्मा गांधी शाळेसमोर गजबजलेल्या ठिकाणी दुपारी अंदाजे 3 च्या सुमारास एका इसमाने दुसऱ्यावर चाकूने हल्ला करून गंभीररीत्या जखमी केल्याची घटना 26 डिसेंबर रोजी घडली.


जखमी तरुणाचे नाव दिनेश महादेव काळे वय 36 वर्ष रा. बिबी ता. कोरपना असे आहे. तर आरोपीचे नाव भास्कर नारायण कांबळे वय 46 वर्ष रा. गडचांदूर असे आहे.


मिळालेल्या माहितीनुसार पत्नीच्या कारणावरून आरोपीने युवकावर हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. दिनेश व भास्कर यांच्यात झटापट झाली. भास्करने दिनेश वर चाकुने वार केले. मात्र परीसरातील लोक बघत राहिले. काही काळ या परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यात घटनेत दिनेश जखमी झाला व झटापटीत निसटून आपला जिव वाचविण्यासाठी तिथून पळाला. 


या घटनेची माहिती पोलिसांना होताच दिनेशला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे भरती केले. वैद्यकीय अधिकारी ने त्यांच्या वर उपचार केले व जखमीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले. पुढील उपचार करिता चंद्रपूर येथे रेफर केले आहे. या हल्ल्यात युवक गंभीररीत्या जखमी झाला पण, सध्या प्रकृती धोक्याबाहेर आहे.


गुन्ह्यातील आरोपी भास्कर कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींविरोधात पोलीस स्टेशन गडचांदूर येथे कलम 307 भा. द. वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार आमाले यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदुर पोलीस करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या