Click Here...👇👇👇

गडचांदूरात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा #chandrapur #Korpana #Gadchandur

Bhairav Diwase

211 दिव्यांगाणी केली नोंदणी
कोरपना:- जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन शाखा गडचांदूर व स्वयंभू दिव्यांग बहुउद्देशीय संस्था गडचांदूरच्या वतीने 3 डिसेंबर रोजी दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



गांधी चौक ते दुर्गा माता मंदिर पर्यंत ढोलताश्यांच्या गजरात वाजत गाजत दिव्यांग बांधवांची रॅली काढली.अचानक चौक येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय गाठे होते ,उद्घाटन डॉ.शारदा येरमे व डॉ.प्रविण येरमे यांनी केले.अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चे प्राचार्य प्रमोद खडसे,डॉ.जयदेव चटप,मंडल अधिकारी चव्हाण,डॉ. दादाजी डाखरे,जिल्हा मध्यवर्ती बँक चे व्यवस्थापक जोगी व इतरांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.सर्व प्रथम भारत मातेच्या प्रतिमेला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी दिव्यांगांना मार्गदर्शन केले. ब्लैंकिट,प्रमाणपत्र वाटप व दिव्यांग नोंदणी करण्यात आली.

जागतिक दिव्यांग दीन जल्लोषात प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन व स्वयंभू दिव्यांग सेना यांच्या वतीने 3 डीसेंबर 2022 जागतीक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. गांधी चौक येथून रॅली काढून रॅलीत शेकडो दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवला, दिव्यांगाणा दिव्यांग प्रमाणपत्र,नाष्टा फळ, मिठाई वाटप,दिव्यांग बांधवांना ब्लँकेट वाटप व्यावसायिक शिक्षणाबद्दल मार्गदर्शन, लघुउद्योगा बद्दल माहिती देण्यात आली.

कार्यक्रम चे प्रास्ताविक सतीश बिडकर यांनी केले,संचालन सानिया दुर्गे, यांनी केले,तर आभार नितीन सपकाळ यांनी मानले, याप्रसंगी प्रहार स्वयंभू चे अध्यक्ष पंकज मानुसमारे, प्रमोद मोहुर्ले, पवन येंगोंत्तीवर, लक्ष्मी वरभे, सरोजिनी मडावी, ममता निषाद सूरज बार ,वाजीद शेख, अरविंद सरवर, विमला बाई मडावी दिव्यांग बांधवांची व नागरिकांची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.