(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर नगर परिषद ही आता नावापुरतीच नगर परिषद आहे, असे अनेक जनसामान्यांना वाटत आहे शहराच्या विकासासाठी नगर परिषदेकडे लक्ष द्यायला वेळच नाही तर कार्यालयात सुद्धा कर्मचारी उपस्थित राहत नाही मग हे नेमके पगार घेतात तरी कशाचा.
नुकतेच प्रभाग सहा बाजार रोड अंगणवाडी समोर ओपन स्पेस आहे. त्या ठिकाणी ग्रीन जिम लावण्यात आली. लहान मुलांना खेळायला साहित्य मिळाल्याने मुलांना खुप आनंद झाला पण त्या ठिकाणी असलेले मातीचे ढिगारे व मोठमोठे दगड यामुळे त्यांना खेळायला खुप ञास व्हायचा हे AIM च्या कार्यकर्त्यांना लक्षात येताच त्यांनी त्या जागेची सफाई करून स्वखर्चाने त्या जागेवर रोलर फिरवले त्या नंतर तो परिसर आता लहान मुलांना खेळायला उत्तम झाला असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
या मध्ये युवा अध्यक्ष मैनु बेग
युवा उपाध्याक्ष तौसीफ अली युवा महासचिव यूसुफ शेख युवा कोषाध्यक्ष अतहर शाह व इतर कार्यकर्त्यांनी काम केले.