चंद्रपूर कुंभार व इतर विट उद्योजकाला माती उत्खननाला राॅयल्टी परवाना देण्यात यावे:- ॲड. हरीश मंचलवार #chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- चंद्रपूरातील कुंभार व इतर विट उद्योजकाला गेल्या काही दिवसापासून मातीच्या लाल विटा तयार करण्या करिता लागणारी माती उत्तखननाला रॉयल्टी तापूर्त्या परवण्या करिता शासकीय कार्यालयात फेऱ्या घालून तोडगा निघत नव्हता विट उद्योजक चे विधी तज्ज्ञ‌ व कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष ॲड. हरीश मंचलवार, उपमहापौर राहूल पावडे, भाजपा अनु. जाती मोर्च्याचे अध्यक्ष धम्म्यप्रकाश भस्मे, कुंभार समाजाचे सरचिटणीस आकाश खिरे यांच्या नेतृत्वात तोडगा काढण्या करिता कुंभार समाजाचे आधारस्थंभ, विकासपुरुष, मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी तात्काळ नागपूर येथे भेट घेऊन तात्पुरता विट परवाना संबधी अडचण सांगितली.

ना. सुधीर भाऊ नी तात्काळ जिल्हधिकारी यांना निर्देश दिले की विट उद्याजकांना तात्पुरता परवाना देण्यात यावा जिल्हाधिकारी यांनी सहमती दर्शवली, कॅबिनेट मंत्री ना. सुधीर भाऊ यांच्या निर्देशानुसार काल जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी समक्ष तहसीलदार, खनिज कर्म अधिकारी व विट उद्योजक यांची सविस्तर बैठक झाली त्या बैठकीमध्ये ॲड. हरीश मंचलवार यांनी वीट भट्टी उद्योजकांची प्रखर बाजू मांडण्यात आली व भारत का राजपत्र मधील परिशिष्ट 9 तरतुदीचे interpretation ( स्पष्टीकरण)समजवून सांगण्यात आले,त्यानंतर मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी तहसीलदार आणि खनिज कर्म अधिकारी यांना निर्देश देण्यात आले की तात्काळ मातीच्या विटा तयार करण्याकरिता लागणाऱ्या मातीची उत्खनन बाबत रॉयल्टी परवाने देण्यात यावे.