Top News

अबब..... सहावीच्या मुलांना १ लाख ८० हजार फी #chandrapur


शासकीय सैनिक शाळेतील अवाढव्य फी कमी करण्याची पालक महासंघाची मागणी


चंद्रपूर:- महाराष्ट्रातील चंद्रपुर व सातारा शासकीय सैनिक विद्यालयात शासनाकडुन दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात यावी यासाठी अखिल भारतीय शासकीय सैनिक शाळा पालक संघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार अशोक नेते, आमदार किशोर जोरगेवार, आमदार बंटीभाऊ भांगडीया इत्यादी महोदयांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे.


भारत देशातील सैन्यामध्ये कुशल अधिकारी बालपणापासुन घडविण्यासाठी प्रत्येक राज्यात किमान एक सैनिक स्कुल स्थापन करण्याची संकल्पना भारत सरकारने आखली ही अभिनंदनीय बाब आहे आणि त्या योजनेनुसार महाराष्ट्रात देशातील पहिले सातारा येथे व चंद्रपूर येथे देशातील पहिले अत्याधुनिक सैनिक स्कुल अस्तित्वात आहे.साताऱ्यात १ लाख ४० हजार तर चंद्रपुरात १ लाख ८० हजार फीज असल्याने गरिबांची मुले गुणवत्ता यादीत येऊन देखील शिक्षण घेऊ शकत नाही त्यामुळे फीज कमी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

इतर राज्याच्या तुलनेत शिष्यवृत्ती कमी असून जिल्हा परिषद शिक्षकांच्या पाल्यांना ३२७ रुपये शिष्यवृत्ती ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे तसेच शाळेची असलेली अवाढव्य फी व मिळणारी तुटपुंजी शिष्यवृत्ती यामुळे ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाहीत व त्यांचे स्वप्न पुर्ण होऊ शकत नाही.
समाजकल्याण विभाग व शालेय शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती रक्कम त्वरीत मंजुर करण्यात यावी.

महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील अनु. जाती / जमाती / इतर मागास वर्ग आणि शालेय शिक्षण विभाग शिष्यवृत्ती योजना त्वरीत मंजुर करण्यात येवुन मुलांना एक उत्तम सैनिक शाळेत शिक्षण मिळुन देशाची सेवा करण्याची संधी मिळावी अशी निवेदनाद्वारे अखिल भारतीय शासकीय सैनिक शाळा पालक महासंघाचे अध्यक्ष नवनाथ धांडोरे,सरचिटणीस दुशांत निमकर,कार्याध्यक्ष उमाजी कोडापे,रत्नाकर चौधरी,मोटे सर,उदगिरकर साहेबराव,मनोहर आंबोरकर,अमित झाडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सैनिक शाळेची प्रवेश परीक्षा १५ हजार विद्यार्थी देत असतात त्यापैकी ८० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.अवघड परीक्षा देऊन ही पावणे दोन लाख रुपये फी?? गरिबांनी सैनिक शाळेत प्रवेश घ्यायचा नाही का??शासनाने शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी किंवा फी कमी करावी अन्यथा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पालक महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
-नवनाथ धांडोरे
अध्यक्ष
अखिल भारतीय शासकीय सैनिक शाळा पालक महासंघ


"सैनिक शाळेत शिकणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या पाल्यांना ३२७/- रुपये शिष्यवृत्ती ही लाजिरवाणी बाब असून ती पूर्णतः बंद करण्यात यावी वा त्यात वाढ करण्यात यावी तसेच या शिष्यवृत्ती बाबत वाढ न झाल्यास केंद्र स्तरावर देखील पाठपुरावा करू.
-दुशांत निमकर सरचिटणीस
अखिल भारतीय शासकीय सैनिक शाळा पालक महासंघ

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने