Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या #chandrapur #pombhurna #suicide



पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूर परीसरातील शेतात एका युवकाने गळफास (hanging) घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शनिवारी (saturday) सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

राजू उर्फ राजेश हरिदास ढावरी (अंदाजे वय ३५ वर्ष) रा. भोयेगाव ता. कोरपना असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. चेक बल्लारपूर येथील रविंद्र पानपट्टे यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनास्थळी पोलिस दाखल होत या प्रकरणी पोलिस (police) दाखल पंचनामा करीत आहे. पुढील तपास पोंभुर्णा पोलिस स्टेशनचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार सुरेश बोरकुटे, बिट जमादार राजकुमार चौधरी, अविनाश झाडे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत