(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर शहर क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालय, हॉटेल, मंगल कार्यालय, धार्मिक जागा, व इतर आस्थापना यांचा कचरा नगरपरिषद चे घंटागाडीने तसेच नगर परिषदेचे स्वयंचलित वाहनाद्वारे दिलेल्या कंत्राटदाराने नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या जागेवर टाकायचे असते. त्यासाठी शहर नगर परिषदेने शहराच्या बाहेर जागा सुद्धा लिजवर घेतलेली आहे. शहरात होणारे धार्मिक सार्वजनिक व शासकीय कार्यक्रमाच्या वेळी निर्माण होणारा कचरा वेगवेगळ संकलन करून नगर परिषदेने ठरवून दिलेल्या संकलन केंद्रावर जमा करावा लागतो. परंतु अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या कंत्राटदाराला दिलेल्या कामाच्या करारनाम्यात काही वेगळाच करार केलेला आहे असे दिसते.
या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील जमा केलेला संपूर्ण कचरा मेलेले श्वान,डुक्कर , गावातील सर्व घाण हे सर्व यांनी गडचांदूर शहरातील जुने ग्रामदैवत असलेले लंगडा मारुतीचे मंदिर व ऐतहासिक बुधभुमीच्या,परिसरात फेकला आहे, ज्यामुळे या नैसर्गिक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांना श्वास थांबवून रहदारी करावी लागते, जे असहनीय आहे. नगरपरिषदेने केलेल्या करारात स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की शासनाच्या अस्तित्वात असलेल्या कुठल्याही पर्यावरण व जीवित मालमत्तेची नुकसान होत असल्यास नगरपरिषद संबंधित कंत्राटदार किंवा संस्थेवर दोषी असल्यास दंडाची वसुली करण्यात येते, परंतु वारंवार ही गोष्ट नगरपरिषदेच्या लक्षात आणून दिल्यावर सुद्धा नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी या कंत्राट दारावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
उलट वाघोबा मंदिर परिसरातील कचरा उचलून ठराविक जागेवर टाकत कंत्राटदाराच्या चुकीला बगल देण्याचे काम नगर परिषद कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे त्या परिसरात फेकलेला पूर्ण कचरा ठेकेदारांनी उचलून त्यांच्या ठराविक जागेत टाकावा व त्या कंत्राट दारावर नगरपरिषद तर्फे दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.