पोलिसांचा रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम #chandrapur #sindewahi #police

Bhairav Diwase


सिंदेवाही:- तालुक्यात वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता नागरिकांचे ट्रॅक्टर, बैलबंडी, सायकल, दुचाकी वाहन, यांना विशेष मोहीम राबवून रिफ्लेक्टर लावून देण्यात आलेले आहेत. तसेच वाढते वाहतूक अपघात रोखण्याकरिता जनजागृती बॅनर शहरातील मुख्य शिवाजी चौक, बस स्टॅन्ड तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी बसविण्यात आलेले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना बिना हेलमेट वाहन चालवू नये, सीट बेल्ट लावणे, मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, अति वेगाने वाहने चालवू नये, अवैध प्रवासी वाहतूक करू नये, अशा प्रकारे वाहतुकीचे नियम समजावून त्याचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आलेले आहे.

या अभिनव उपक्रमात चंद्रपूर जिल्हाचे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, एस.डी.पी.ओ. ब्रह्मपुरी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश घारे, पोलीस नाईक शरद सावसाकडे, संजीव बेडेकर, मंगेश मातेरे, रणधीर मदारे यांचा सदर मोहिमेमध्ये सहभाग होता. नागरिकांनी पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक आणि अभिनंदन केले.