सरदार पटेल महाविद्यालय सुवर्ण पदकाचे ठरले मानकरी
चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन मुला- मुलीच्या फुटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय संघ सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहे.
गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धा दि. 9 डिसेंबर 2022 रोजी नेवजाबाई हितकरनी महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे आयोजीत करण्यात आली होती. स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाने सुवर्ण पदक पटकाविले.
संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे, कार्यकारी अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षित, सदस्य सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माघमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावार, शा. शि. विभाग प्रमुख डॉ. विजय ए. सोमकुंवर, डॉ. कुलदीप आर. गोंड, हनुमंतु डंबारे, प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत