दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू #chandrapur #Tigerनागभीड:- दोन वाघांची झुंज होऊन तीन वर्षांच्या वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. बुधवारी (7 डिसेंबर) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास नागभीड तालुक्यातील चिंधीचक हुमा बीट येथे ही घटना घडली.

वनविभागाने मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केल्यानंतर घटनास्थळीच शवविच्छेदन केले. त्यानंतर त्याच ठिकाणी दहन देखील करण्यात आले आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील चिंधीचक हुमा बीट येथे कर्मचारी गस्तीवर असताना एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर या घटनेची माहिती नागभीडचे वनपरिक्षेत्राधिकारी हजारे यांना देण्यात आली.

या माहितीनुसार विभागीय वनअधिकारी मल्होत्रा, एसईएफ डोनाने, वनपरिक्षेत्राधिकारी हजारे, राऊंड ऑफिसर सय्यद, वनरक्षक बुरले, वाईल्ड लाईफचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी पोहोचून वाघाचा पंचनामा केला. मृतावस्थेतील वाघ हा अडीच ते तीन वर्षाचा आहे. दोन वाघांच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. विशेष म्हणजे मृत्यूनंतर त्या वाघाच्या शरीराचा काही भाग रानकुत्र्यांनी खाल्लेला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत