सरपंचानेचच केली बांबूच्या ताटव्यांची तस्करी #chandrapur

Bhairav Diwase
1

कारवाईत तीन बोलोरो वाहन जप्त


चंद्रपूर:- बोलोरो पिकअप वाहनाच्या साह्याने चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील बफर झोनमधील बोर्डा परिसरातून बांबू ताटव्यांची अवैध वाहतूक करताना निंबाळा येथील सरपंचाला चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील बफर झोनमधील कर्मचाऱ्यांनी बुधवारी भल्या पहाटे कारवाई करून ताब्यात घेतले. या कारवाईत तीन बोलोरो वाहन जप्त करण्यात आले.

गावाच्या विकासाची धुरा सांभाळणारे सरपंच असा प्रकार करत असतील, तर विकास कसा होणार, असा प्रश्न या कारवाईतून उपस्थित झाला आहे. यापूर्वीही त्यांच्यावर दोनदा कारवाई करण्यात आली होती हे विशेष. सौरभ दुपारे असे त्या सरपंचाचे नाव आहे.

चंद्रपूर वनविभागातील बफर झोन क्षेत्रातून बांबू व ताटव्यांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी एस. व्ही. महेशकर यांना मिळाली. त्यांनी बुधवारी भल्या पहाटे कुडकुडत्या थंडीत आपल्या पथकासह बोर्डा जंगल परिसर गाठले. यावेळी तीन वाहन जाताना दिसून आले. त्यांनी एम एच ३४, एव्ही १५८१ व एमएच ३४ बीझेड ०२५५ हे बोलेरो व टाटा इन्ट्रा एमएच ३४ बीझेड ०३३१ हे तीनही वाहन थांबवले. यावेळी वाहनात बांबूचे ताटवे आढळून आले. स्वत: सरपंच सौरभ दुपारेही तेथे उपस्थित होते. आरएफओ महेशकर यांनी तीनही वाहने जप्त केले.

ही कारवाई चंद्रपूर बफरच्या वनपरीक्षेत्र अधिकारी एस. व्ही. महेशकर यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहायक आर. यु. बेग, वनरक्षक पर्वतकर, वनरक्षक प्रीती मडावी, महेश दाते यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले. आरएफओ महेशकर यांनी सरपंचावर केलेल्या या कारवाईने अवैध बांबूकटाई करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा