पोटावर जगणारी बिऱ्हाडं कसे दिवस भोगत असतील या थंडीच्या दिवसांत... Chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूरचा युवा कवी स्वप्नील मेश्राम यांच्या कवितेने केले अंतर्मुख


चंद्रपूर:- चंद्रपूरात सुरु असलेल्या ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनात 'कवितेच्या काठावर ' हे सत्र पार पडले. या कविसंमेलनात चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील कवी सहभागी झाले होते. या कविसंमेलनाचे संचालन युवा कवी स्वप्नील मेश्राम यांनी केले.

थंडीच्या दिवसांत रस्त्यांच्या कडेला उघड्या आभाळाखाली पोटावर जगणारी बिऱ्हाडं कसे जगत असतील हा प्रश्न मांडणारी कविता सादर करत उपस्थित रसिकांना अंतर्मुख केले. या कविसंमेलनाचे अध्यक्ष दीपक शिव यांनी सुंदर कविता सादर केली तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली चे कवी डॉ. प्रविण किलनाके उपस्थित होते. आभार सुनील बावणे यांनी मानले.

दरम्यान शुक्रवारी सायंकाळी वाशीम येथील मोहन शिरसाट यांच्या अध्यक्षतेत व राजुरा येथील किशोर कवठे, यांच्या संचालनात विदर्भातील निमंत्रित कवींचे कवी संमेलन पार पडले. त्यात डॉ. पद्मरेखा धनकर - चंद्रपूर, उषाकिरण आत्राम- कचारगढ, कुसुम आलाम - गडचिरोली, गिरीश सपाटे - रामटेक, मालती सेमले - गडचिरोली, गजानन फुसे- वाशिम यांच्यासह अन्य मान्यवर कवी सहभागी झाले होते व सर्व कवींनी अतीशय बहारदार कविता सादर केल्या.