Top News

विदर्भ साहित्य संमेलनाच्या कथाकथनात रमले प्रेक्षक #chandrapur



चंद्रपूर:- संमेलनातील कथा कथनाला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. लेखक,कथाकार सुनील देशपांडे, लेखिका वर्षा चौबे, लेखक डॉ. विद्याधर बन्सोड यांच्या कथाकथनाने प्रेक्षकांची मने जिंकली. वर्षानुवर्षे चालत आलेल्या साहित्याच्या परंपरेला मिळणारे प्रेक्षकांचे आकर्षण व उत्साह ‘व्हॉट्सॲप’ आणि ‘फेसबुक’ च्या जमान्यातही टिकून असल्याचे पुन्हा दिसून आले.
कथाकथन सत्राचे अध्यक्ष चंद्रशेखर वाडेगावकर हे होते. संचालन डॉ. सविता सादमवार,तर आभारप्रदर्शन प्रा. सुमेधा श्रीरामे यांनी केले.

चंद्रशेखर वाडेगावकर यांचा ‘चौरंग’ हा कथासंग्रह तसेच वर्षा चौबे यांनी सरकारी पद्धत, गरीबांवर होणारा अन्याय आणि चंद्रपुरातील वाघांचे भय, वनहक्क कायदा या विषयांवर कथाकथन केले. डॉ. विद्याधर बन्सोड यांनी ‘हैवान’ ही कथा सांगितली.
सुनील देशपांडे यांनी चाकरमानी माणसांची 'फ्लॅट'मधील ‘बापरे साप’ ही वास्तवात असलेल्या स्वप्नापेक्षा कृतीत आलेल्या अनुभवाची ही कथा विनोदी स्वरुपात सादर केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने