Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

आदेश होऊनही कामावर घेण्यास टाळाटाळ #chandrapurकामगारांसह सुरज ठाकरे ही बसणार उपोषणास


गोंडपिपरी:- गेल्या २ वर्षापासून गोंडपिपरी नगरपंचायत अंतर्गत काम करीत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा लढा हा जय भवानी कामगार संघटना लढत आहे. यामध्ये कामगारांनी घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करत स्वतःच्या हक्काकरिता जय भवानी कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार विभागांमध्ये नगरपंचायत व नगरपंचायतीने वेळोवेळी नेमून दिलेल्या ठेकेदाराच्या माध्यमातून कामगारांच्या हक्कांचा व कामगारांना शासनाने ठरवून दिलेल्या वेतनाचा वेतन भंग होत असल्याबाबत कामगारांनी तक्रारी केल्या व त्याचे फलस्वरूप म्हणून नुकत्याच नगरपंचायत च्या झालेल्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर काँग्रेस च्या नगराध्यक्ष व काँग्रेसचा नगरसेवक यांनी जाणून-बुजून सफाई कामाचा कंत्राट संपला असल्याने तात्पुरती नेमणूक केलेल्या ठेकेदाराच्या माध्यमातून १९ कामगारांना ते जय भवानी कामगार संघटनेचे कामगार आहेत व सातत्याने आपल्या हक्कांबाबत आवाज उचलत आहेत म्हणून राजकीय सूडबुद्धीने ७ महिन्यांपूर्वी कामावरून कुठलीही पूर्वसूचना न देता व काहीच गरज नसताना बेकायदेशीर रित्या निष्काशीत करून टाकलेले आहे.

कामगारांवर उपासमारीची पाळी आल्याने कामगारांनी यापूर्वी देखील अनेक निवेदने सादर केली, कामगारांचे मानसिक रित्या त्यांचे खच्चीकरण झाल्याने नगरपरिषद समोरच आत्महत्येचा प्रयत्न देखील यापूर्वी झालेला आहे. नुकताच कामगारांना शासनाने ठरवून दिलेल्या किमान वेतनाप्रमाणे वेतन न मिळाल्याने कामगारांचा मेहेनतीचा जो पैसा कंत्राटदारांनी स्वतःच्या खिशात घातला हा कामगारांच्या हक्काचा पैसा कामगारांना मिळवून देण्याकरिता कामगार न्यायालयाने निर्णय कामगारांच्या बाजूने लागला व कामगारांना श्री. सुरज ठाकरे यांच्या प्रयत्नाने एकूण:- २९,५०५००/- रकमेचा आदेश निघाला असल्याने गणपती नगरपंचायत ची तारांबळ उडाली. नुकत्याच लागलेल्या या निर्णयामुळे कामगारांना जाणीवपूर्वक कामावर घेण्यास विलंब केला जात आहे.

या सर्व बाबींचा एकंदर सारासर विचार करता लोकशाही वर व महाराष्ट्र शासनावर व कामगार कायद्यावर विश्वास ठेवत कामगारांना घेऊन जय भवानी कामगार संघटनेने शांततेचा मार्ग अवलंबून धरला व सातत्याने पाठपुरावा करत अखेर माननीय उपविभागीय दंडाधिकारी साहेब गोंडपिंपरी यांच्या अध्यक्षतेखाली एक आठवड्याआधी झालेल्या बैठकीमध्ये सध्या स्थितीमध्ये गोंडपिंपरी नगरपरिषद यांच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी गोंडपिपरी चे तहसीलदार माननीय. मेश्राम साहेब यांच्या खांद्यावर असल्याने त्यांनी त्या बैठकीमध्ये तोंडी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवला तरी देखील कामगारांना कामावर न घेतल्याने याबाबत माहिती घेतली असता तहसीलदार गोंडपिपरी यांच्याकडे सद्यस्थितीत गोंडपिपरी नगरपंचायत चा मुख्याधिकारी प्रभार असल्याने त्यांनी कामगारांना ज्येष्ठते नुसार कामावर घेण्याचे आदेश दिले असताना देखील काही शासकीय कर्मचारी राजकीय सद्बुद्धीने कामगारांना कामावर घेण्यास टाळाटाळ करीत आहेत.

अधिकाऱ्यांचा आदेशाचे पालन करण्याकरिता कर्मचाऱ्यांना पोटदुखी का? असा प्रश्न समस्त कामगारांना उपस्थित झाला असल्याने दिनांक १ जानेवारीला जर बेकायदेशीर रित्या काढलेल्या समस्त कामगारांना कामावर घेतले नाही, तर दिनांक:- २ जानेवारी २०२३ पासून समस्त कामगार हे दिनांक ६ जानेवारी २०२३ पर्यंत साखळी उपोषण सुरू करतील. व दिनांक:- ७ जानेवारी २०२३ पासून युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज अरविंद ठाकरे स्वतः आमरण उपोषणाला कामगारांसह बसणार असे श्री. सुरज ठाकरे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत