ज्ञानोबा माऊली
नाव किती गोड
ज्ञानाचा तो साठा
जगी नसे तोड
आपेगाव जन्म
कुळ कुलकर्णी
ब्राह्मण समाज
संत शिरोमणी
हरिपाठ गाई
मुखातले बोल
वेद वदवले
रेडा तो अबोल
निवृत्ती थोरला
मान तया गुरु
चाले वाट सदा
सत्कार्य ते सुरु
देवा दान मागे
पसायदानाचे
कल्याण करण्या
सदा मानवाचे
ज्ञाना रचियला
सत्मार्गाचा पाया
मायबापा विना
सांभाळली काया
थोरवी महान
ज्ञानेश्वरी ग्रंथ
छ्त्र छाया दिली
वारकरी पंथ
समाधीस्थ झाले
अजान तो वृक्ष
कार्तिक मासात
होता कृष्ण पक्ष
धन्य ती आळंदी
ज्ञानदेव वास
पालखी सोहळा
एकादशी खास
हर्षा भुरे, भंडारा