Top News

ई. सुभाष कासनगोट्टूवार यांच्या कार्य बघता मनपाने ब्रँड अंबेसीडर करावे:- लक्ष्मणराव गमे गूरुकुंज आश्रम मोझरी #chandrapur



मनपा स्वच्छता लीग अंतर्गत वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळाच्या वतीने मंडळ प्रमुख माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या नेतृत्वाखाली १ते ३० नोव्हेंबर पर्यंत स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले,रोज या अभियानात १०० च्या वर स्वच्छता दूतानीं तूकुंम १ प्रभागातील व चौकात स्वच्छता, प्लास्टिक मुक्त,वेस्ट ऑफ बेस्ट, कंपोस्टिंग, अभियान राबविले,शेवटच्या दिवशी तुकुम येथे मातोश्री विद्यालय पासून जनजागृती सह भव्य रॅली काढण्यात आली,ज्यात महिला पुरुष व लहान मुलांनी महापुरुषांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले , रे लीच्या रूपांतर शहीद भगत सिंह चौकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सामुहिक प्रार्थना मध्ये झालं.
🏥
गुरुदेव सेवा मंडळ राऊत लेआउट यांनी प्रार्थनेची धुण गायली या चौकात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त श्री विपिनजी पालीवाल,डॉ.प्रेरणा कोलते, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ सर्वाधिकारी गुरुकुंज मोझरी श्री लक्ष्मणराव गमे आणि श्री रूप लाल कावळे , श्री बबनराव अनमुलवार,श्री विजय चिताडे, श्री पुरुषोत्तम राऊत, श्री अन्याजी ढवस, श्री वसंतराव धनरे पाटील, श्री धर्माजी खंगार, सौ प्रज्ञाताई बोरगमवर, श्री पुरुषोत्तम सहारे, सो मंजुश्री कासंगोटूटवार आदींची उपस्थिती होती, कार्यक्रमाची सुरुवात सामुहिक प्रार्थनेने करण्यात आली,यावेळी मनपा आयुक्त यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याने प्रेरित होत मंडळाने उत्कृष्ट कार्य केल्याचे म्हणाले,तसेच डॉ प्रेरणा कोलते यांनी सुभाष कासनगोट्टूवार आदर्श नगरसेवक महणून संबोधित केले,
,दरम्यान लहान मुलांच्या चमुनी स्वच्छ्ता जनजागृती नाटिका सादर केली,या
वेळी असंख्य नागरिकांची उपस्थिती होती

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने