Top News

अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna


गावातील लहान मुलेही गेली दारूच्या आहारी


पोंभूर्णा:- पोंभूर्णा (pombhurna) तालुक्यातील वेळवा (welwa) गावात गेल्या सहा महिण्यापासून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री (Illegal sale of alcohol) सुरू आहे. मद्यपींची इच्छा पुरविण्यासाठी दारू विक्रेते दारुची घरपोच सेवा देत आहे.शाळकरी मुलेही दारूच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. वेळव्यातील दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी व दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी गावातील महीलांनी पुढाकार घेत शेकडोच्या संख्येने पोंभूर्णा येथे धडकल्या यावेळी अवैध दारूविक्रेत्यावर कार्यवाही करण्यात यावी या मागणीला घेऊन पोंभूर्णा पोलीस उपनिरीक्षक यांचेकडे तक्रारीचे निवेदन देण्यात आले.

गेल्या सहा महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वेळवा गावात अवैध दारू विक्री चालू आहे. सकाळपासूनच अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी तळीरामांची रांग लागत असते. एवढेच नाही तर आष्टा, चेक आष्टा, सोनापुर, चेक फुटाणा, मोहाळा, सेल्लूर, चेक कोसंबी या गावातील दारू शौकीन सुद्धा वेळव्यात दारू प्यायला येत आहेत. फोनवर सुद्धा मद्यपींना दारू पुरवठा केला जातो.

 गावातील गल्ली-मोहल्ल्यातील वातावरण दुषीत होत चालले असुन आया- बहीनींना याचे नाहक त्रास सहन करावे लागत आहे. अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. दारूच्या आहारी आता शाळकरी मुलेही गेली आहेत. यावर अंकुश लावण्यासाठी व दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी मागणीला घेऊन वेळवा येथील महिला व ग्रामस्थांनी पोंभूर्णा येथे येऊन पोलिस उपनिरीक्षक संतोष येनगंदेवार यांना लेखी तक्रारीचे निवेदन दिले.

यावेळी सरपंच सिमा निमसरकार, शोभा उमक, संगिता संतोषवार, कविता केमेकार, वर्षा कुळमेथे, लता कावटवार, सरस्वती जाधव, व्यंकटलक्ष्मी नुशेट्टी, यांचेसह शेकडो महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने