शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग; लाखोंचे नुकसान #shortcircuit #fire #firenews #pombhurna #chandrapurपोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुका चिंतलधाबा येथील जि. प. शाळेजवळच असलेल्या रिध्दी कंप्युटर आणि आपले सरकार सेवा केंद्र या दुकानाला शॉर्टसर्किट मुळे आग लागली. हि आग आज दुपारच्या सुमारास लागली असून अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.


 प्रशांत मंडरे यांचे रिध्दी कंप्युटर तर गणेश मिलमीले यांचे आपले सरकार सेवा केंद्र हे दुकान चिंतलधाबा येथे आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता मिलमीले हे दुकान बंद करुन बाहेर गेले. दुपारच्या सुमारास दुकानाला आग लागल्याचे फोनवर कळाले. ते येईपर्यंत दुकान जळाले होते. दुकानातील कंप्युटर, प्रिंटर, आधार कार्ड तयार करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक वस्तू, फॅन या बरोबरच कागदपत्रे जळाले.


गावकऱ्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत दुकानातील इलेक्ट्रिकल सामान जळाले होते. आगीवर नियंत्रण आणाले असून या आगीत अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानांच्या मालकांनी आधार न्युज नेटवर्क ला दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत