चंद्रपूर शहरात नायलॉन मांजाविरुद्ध मनपा करणार कडक कारवाई #chandrapur

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- नायलॉन मांजामुळे अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयातीवर पूर्णपणे बंदी आणली आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कडक कारवाई केली जाणार आहे. विक्री केल्यास १० हजारांचा दंड, तर साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहे.

दरवर्षी तीळ संक्रांतीच्या उत्सवाला पतंग उडविण्याची परंपरा आहे. त्यासाठी महिनाभरा आधीपासूनच पतंग आणि दोरा यांची विक्री सुरु होते. राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही शहरात हा धागा वापरला जात असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेचे उपद्रव शोधपथक यावर कारवाई करत असुन नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहेत. बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर विक्री केल्यास १० हजारांचा दंड आणि साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई आणि साहित्य जप्त केले जाणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)