नायलाॕन मांजामुळे पोंभुर्णा नगरपंचायतीचे लेखाधिकारी जखमी #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase


पोंभूर्णा :- पोंभूर्णा नगरपंचायतीचे लेखाधिकारी ऊत्कर्ष हनुमानप्रसाद शर्मा हे शुक्रवारला दुपारच्या सुमारास आॕफिस कामानिमित्त चंद्रपुर वरुन बल्लारशाला आपल्या दुचाकीने जात असतांना जुनोना चौकात ऊड्डान पुला जवळ त्याला नाॕयलाॕन मांजा अडकला, मांजाला दुर करतांना त्यांचा हात अक्षरशः कापला गेला. त्यामधुन बरेच रक्त गेले. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हाताला टाके मारण्यात आले. चंद्रपुर येथील पोलीस विभाग आणि महानगरपालीका यांनी नायलाॕन मांजा विक्रेत्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.

दरवर्षी तिळ संक्रातीनिमित्त पतंग ऊडविण्याची पंरपरा आहे. त्याकरीता महिनाभर अगोदरच पंतग आणि मांज्याची विक्री केली जाते. पंरतु बाजारात मात्र मोठ्या प्रमाणात नाॕयलान मांजाची विक्री केली जाते. नाॕयलान मांजामुळे दरवर्षी घटना घडतात मात्र कठोर कार्यवाही होतांना दिसत नाही.त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारात सर्रासपणे नाॕयलान मांजाची विक्री केली जात आहे. अश्या या नाॕयलान मांजामुळे जिवघेण्या घटना घडु नये याकरिता पोलीस प्रशासन आणि महानगरपालीका यांनी कठोर कार्यवाही करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी जनतेतर्फे केली जात आहे.