सुगंधित तंबाखू विक्रेत्यांच्या दुकानांवर धाड #chandrapur #Korpana



कोरपना:- कोरपना व वनसडी येथील किराणा दुकानांवर धाड टाकून पोलिसांनी अवैध सुंगधित तंबाखू जप्त केला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. येथील आरोपी मकसुद मो. मन्सूर पारेख (४३) यांच्या किरणा दूकानातून सुंगधित तंबाखूची अवैधरीत्या विक्री होत असल्याची गोपनीय माहिती कोरपना पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दुकानावर धाड टाकली. यावेळी पोलिसांनी दुकानातून मजा, हुक्का तंबाखू, इगल हुक्का तंबाखू, चारमिनार सुगंधित तंबाखूचे २५५ डब्बे किंमत १ लाख ४६ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध पोलिस हवालदार संचक देवकते यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच वनसडी येथील किराणा दुकानात धाड टाकून -१४ नग सुगंधित तंबाखू जप्त केला.

या प्रकरणात पोलिस उपनिरक्षक शारदा आवारे यांच्या तक्रारीवरून आरोपी इरफान फुल मोहमद शेख (४२) व नोकर सारंग बुर्लावार (रा. वनसडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तिन्ही आरोपिंना न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी नायर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने गेली.

पुढील तपास कोरपना पोलिस ठाण्याचे ठाणेदार सदाशिव ढाकने यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या कारवाईमुळे कोरपना पोलिस ठाणे हद्दीतील अवैध तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत