वडिलांच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल
चंद्रपुर:- प्रेयसीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमुळे नैराश्य होऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बल्लारपूर शहरातून समोर आली आहे. बल्लारपूर शहरातील राजेंद्र प्रसाद वॉर्डतील रहिवासी प्रशिक संजय भसारकर (20) असे मृताचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रशिक संजय भसारकर यांचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मुलीच्या कुटुंबीयांना प्रेमप्रकरण माहिती झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी अमर तेलंग व दर्शन तेलंग यांनी प्रशिकवर हल्ला केला होता. त्यात प्रशिक गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुद्धा केली होती.
परंतु या घटनेपासून प्रशिक नैराश्यात होता. आरोपी प्रशिकला गुन्हा वापस घेण्याची धमकी देत होते. वारंवार मिळणाऱ्या धमकीमुळे भयभीत होऊन प्रशिकने सोमवारी सायंकाळी घरी कुणीच नसल्याचे बघून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
झालेला प्रकार लक्षात येताच मृतकाचे वडील संजय बापूराव भासारकर (49) यांनी तत्काळ बल्लारपूर पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली. नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी ठिय्या दिल्याने पोलिसांनी प्रशिकच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या अमर तेलंग व दर्शन तेलंग या दोघांना भावांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम भादंवी च्या कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार उमेश पाटील चा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड पुढील तपास करीत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत