Top News

अंबुजा सिमेंट फॉउंडेशन उपरवाहीतील मुला-मुलींची उत्तुंग भरारी #Chandrapur #Korpana


चंद्रपूर जिल्हा सब ज्युनियर अथलेटिक्स चॅम्पियनशिप व राज्यस्तरीय निवड चाचणी संपन्न


कोरपना:- अंबुजा सिमेंट फॉउंडेशन उपरवाही तर्फे 10 व 12 वयोगटातील मुले व मुली निवड चाचणीमध्ये सलोनी आत्राम जि. प. प्राथ शाळा हरदोना हिची 10 वर्ष वयोगटामधून 100 व 50 मीटर रनींग मध्ये गोल्ड पदक, अंजली बोढे गोळा फेक स्पर्धेत गोल्ड पदक, मान्यता आत्राम गोळा फेक स्पर्धेत रजत पदक, 200 मीटर रनींग मध्ये राधा वरारकर कांस्य पदक 60 मीटर रनींग मध्ये प्रीती कोटनाके कांस्य पदक, उंच उडी मध्ये अनिकेत तोडासे कांस्य पदक तसेच 100×4 रिले रेस स्पर्धेमध्ये मुले व मुली दोन्ही गटांनी रजत व कांस्य पदक पटकाविला आहे.

या स्पर्धेच्या यशस्वीतेकारिता सरोज अंबागडे क्रीडा व शिक्षण विभाग प्रमुख तसेच सुरेश गावंडे व क्रीडाशिक्षक विक्की मुन यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व स्पर्धेकारिता सर्व शालेय शिक्षक व मुख्याध्यापक यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने