चंद्रपुरला भुकंपाचे हादरे #chandrapur #Earthquakeचंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातही भूकंप सदृश्य धक्के जाणवले. रात्री अंदाजे 9:30 च्या सुमारास हे भूकंप सदृश्य धक्के जाणवले. अंदाजे 2 किलोमीटर भागामध्ये हा प्रभाव जाणवल्याने या घटनेची कुठल्याच भूकंप मापक यंत्रात नोंद करण्यात आलेली नाही.

तज्ज्ञांच्या मते हे धक्के वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) च्या भूमिगत खदनींमध्ये अंतर्गत भूस्खलन झाल्याने बसल्याची शक्यता आहे. प्रशासन सध्या या घटनेनंतर कारणांचा शोध घेत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या