वैनगंगा नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू #chandrapur #bramhapuriब्रम्हपुरी:- मकरसंक्रातीच्या दिवसाला विशेष महत्व असून या दिवशी ठिकठिकाणी पवित्र स्नान केले जाते. रविवारी (दि.१५) ब्रम्हपूरी तालुक्यातील वैनगंगानदीच्या आवळी घाटावर मित्रांसोबत आंघोळीला गेलेल्या एका २२ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

संदर्भ भैसारे (वय २२) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून तो पिंपळगाव येथील राहिवासी होता. ब्रम्हपूरी तालुक्यातील वैनगंगानदीच्या आवळी घाटावर मकरसंक्रातीनिमित्त परिसरातील गावातील नागरिकांची दरवर्षी मोठी गर्दी असते.

रविवारी सकाळपासून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याच तालुक्यातील पिंपळगाव (भो.) येथील संदर्भ भैसारे युवका गावातील काही मित्रांसोबत आंघोळीसाठी आवळी घाटावर गेला होता. दुपारी दीडच्या सुमारास नदी पात्रात काही मित्र उतरुन आंघोळ करीत होते. दरम्यान, संदर्भ भैसारे याला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याचा घाटात बुडून मृत्यू झाला. आवळी गाव हे नदीच्या दुसऱ्या बाजूला भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात आहे. दोन्ही ठिकाणच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत