गोंडपिपरी:- शैक्षणिक सहलीला गेलेल्या तालुक्यातील चेकबोरगावच्या जिल्हा परिषद शाळेतील १२ विद्यार्थ्यांची प्रकृती भोजनानंतर अचानक बिघडली. माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी शनिवारी गोंडपिपरी गाठून विद्यार्थ्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे.
पालकांच्या विनापरवानगीने सहल गेली कशी? स्व. उत्तमराव पाटील वन उद्यानात चिकन शिजलेच कसे? शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडे एवढे दुर्लक्ष झाले कसे? असे अनेक प्रश्न कार्यकत्यांनी उपस्थित केले. ॲड. धोटे यांनी पालकांचे म्हणणे प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी कार्यकत्यांनी केली. त्यानंतर ॲड. धोटे यांनी पालकांचे म्हणणे ऐकून घेत दोषी शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बबन निकोडे, माजी नगराध्यक्ष संजय झाडे, भाजपा कार्याध्यक्ष साईनाथ मास्टे, माजी उपसभापती मनीष वासमवार, गणपती चौधरी, भाजयुमो शहराध्यक्ष प्रशांत येल्लेवार, बंटी बोनगीरवार आदींची उपस्थिती होते