Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo



 

भक्तीचा अद्भुत सोहळा.... #Chandrapur #gondpipari


लखलखत्या निखाऱ्यावरुन भक्त अनवाणी पायाने चालले; पहाटेच्या सुमारास बघायला मिळाला थरार


गोंडपिपरी:- महाराष्ट्र-तेलंगणातील आराध्य दैवत म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील धाबा येथील संत परमंस कोंडय्या महाराज. महाराजांचा यात्रा महोत्सव सध्या संतनगरी 'धाबा' येथे सूरु आहे. या महोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे " अग्निकुंड प्रभावळ ". पवित्र श्रद्धेच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्याचे दाखले पुराणात सापडतात.

भक्तिची अग्नीपरीक्षा घेण्याचा असाच थरारक सोहळा धाबा येथे दरवर्षी आयोजित केला जातो. संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात लालबुंद निखाऱ्याने तूडुंब भरलेल्या कुंडातून भक्त अनवाणी पायाने चालत जातात. यंदाही हा सोहळा तरुण, वयोवृध्द, बालगोपालांच्या उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमासाठी चौकोनी खड्डा खणला जातो. त्या खड्यात मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात. जळालेल्या लाकडाच्या तयार झालेल्या निखाऱ्यांची विधिवत पुजा केली जाते. आणि मग या निखाऱ्यावरून चालण्याच्या थरारक सोहळ्याला सुरूवात होते. मध्यरात्री सूरु होणाऱ्या अग्निकुंड प्रभावळीचा सोहळा अग्नी शांत होईस्तोवर सुरु असतो. भक्तीचा हा अद्भूत सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्र-तेलंगणा-आध्रप्रदेशातील भाविक गर्दी करित असतात. यावेळी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत