बनावट देशी दारू अड्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाड #chandrapur #mul

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चितेगांव येथील ए व्हि जी गोट फार्म येथील बनावट अवैध देशी दारूच्या अड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून 16 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई बुधवारी सकाळच्या दरम्यान करण्यात आली असुन सदर कारवाईमुळे मूल तालुक्यातील अवैध दारूविक्रेत्यामध्ये खळबळ माजली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावर्षी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.मूल तालुक्यातील राज्य महामार्गावर असलेल्या चितेगांव येथील महाविद्यालयाला लागुन असलेल्या शेड मध्ये अवैध बनावटी दारू बनविण्याचे काम सुरू होते, सदर माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती होताच आज बुधवारी सकाळी धाड टाकुन सुमारे 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याठिकाणाहुन रॉकेट देशी दारू प्रवरा डिस्टिलरी अहमनगरच्या नावाने असलेले कागदी खोके आढळुन आले आहे.

जागा मलाक अरूना मरस्कोले फरार आहेत, ज्यान लेबर स्टॉप असलेले पवन वर्मा उर्फ गोले आणि शाम मडावी व इतर सर्व आरोपी फरार आहेत, 26 जानेवारी आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकी दरम्यान दारूदुकाने बंद असल्याने तो सदर दारू याकाळात विकण्याची शक्यता होती.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे श्री वाघ, संदीप राउत, विकास थोरात, जगदीश पवार, अमित सिरसागर, अभिजीत लिचडे, मोनाली कुरूडकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)