Top News

मोबाईलवर आली लिंक; त्यावर केली क्लिक आणि मग.... #Chandrapur #Nashik #socialmedia


नाशिक:- मोबाईलवर लिंक पाठवून वृद्धाच्या क्रेडिट कार्डवरून अज्ञाताने तब्बल 1 लाख 5 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने लांबवले.ही घटना रविवार 22 जानेवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 वा. कालावधीत घडली आहे.

याबाबत परेश तुकाराम चौधरी (53, मूळ रा. नाशिक सध्या रा.टीआरपी, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी सायंकाळी त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने एक लिंक पाठवली.चौधरी यांनी ती लिंक उघडून त्यात सर्व माहिती भरून ओटीपी नंबर ही सबमिट केला.त्यानंतर काहीवेळाने चौधरी यांच्या क्रेडिट कार्डवरून आधी 52 हजार आणि नंतर 53 हजार रुपये असे एकूण 1 लाख 5 हजार रुपये अज्ञाते काढून घेत त्यांची फसवणूक केली.

याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात भादंवी कायदा कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने