२६ जानेवारीला झाशीच्या राणीवर होणार एक पात्री नाटक #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- २६ जानेवारीला संध्याकळी ६.३० वाजता शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळ तर्फे " भारत माता पुजन " चा कार्यक्रमा निमित्त चैताली खटी यांचा एक पात्री नाट्यप्रयोग चंद्रपूर येथील स्थानिक शहीद भगतसिंग चौकातील पठाणपुरा रोड येथे होणार आहे. सदर कार्यक्रमात झाशीच्या राणीवर नाटक सादरीकरण होणार असुन या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून चैताली खटी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा पोलीस उपअधिक्षक राधिका फडके, तर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी चांदा पब्लिक स्कूलच्या संचालिका स्मिता जीवतोडे या असतील.

२१ व्या शतकात युवक देशाभिमुख जगला पाहिजे व सर्व युवकांनी देशाच्या चांगल्या कामात नेहमी अग्रेसर राहावे. जे काही देशविरोधी कारवाया सुरु आहे ,त्या सर्वाना चोख उत्तर द्यावे याच उदात्त हेतूने देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात भारत मातेचे पुजन केले जाणार. त्या नंतर चैताली खटी यांचा हा एक पात्री नाटक सादर होणार आहे . तेव्हा सर्व नागरिकांनी व युवा वर्गानी या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून भारत मातेचे पुजन करावे व जाहीर प्रबोधनाचा लाभ घ्यावा, असे आव्हान शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळतर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)