विद्युत मिटरच्या शार्ट सर्किटमुळे अर्धेघर भस्मसात #chandrapur#pombhurna #fire #firenews


पोभूर्णा:- तालुक्यातील देवाडा बुज. येथील अनिल शेडमाके यांच्या घरातील विज मिटरची वायरिंग शार्ट सर्किट झाल्यामुळे घरात आगीचा भडका उडाला व यात घरातील सामानासहित अर्धघर आगित भस्मसात झाल्याची घटना सोमवारच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान घराशेजारच्या लोकांनी आग विझवल्याने जीवित हानी ठळली.मात्र यात आर्थिक नुकसान झाल्याने शेडमाके यांना चिंता सतावत आहे.

देवाडा बुज. येथील पत्रकार विकास शेडमाके यांचे धाकटे बंधू अनिल शेडमाके हे सोमवारला रात्री जेवण आटोपल्यानंतर परिवारासह आराम करीत होते. सोमवारला रात्रोच्या सुमारास अकरा वाजता त्यांच्या घरातील विद्यूत मिटरला अचानक आग लागली यात धूधू करत आगीचा भडका उडाला यात घरातील सामान जळून खाक झाले.वेळीच आग लागल्याचे लक्षात आल्याने अनिल शेडमाके व त्यांच्या परिवारातील सदस्य घरातून बाहेर निघण्यात यशस्वी झाले.

घराशेजारील लोकांनी तातडीने आग विझवल्याने जीवीत हानी टळली.मात्र यात फार मोठे नुकसान झाले.घराचे कवेलू व फाटे,घरातील सामान जळल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
सदरची माहिती मुल पोलीस स्टेशन व विद्युत वितरण कंपनी पोभूर्णा तसेच तालुका प्रशासनाला देण्यात आली.काही वेळातच पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली.
या घटनेमुळे अनिल शेडमाके यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने व घर जळाले असल्याने त्यांना राहण्याची समस्या निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी अनिल शेडमाके व ग्रामस्थांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत