पतंगाच्या वादातून जीवघेणा हल्ला #chandrapur #Nagpur #attack

Bhairav Diwase


नागपूर:- पाचपावलीच्या लष्करीबागमध्ये पतंगाच्या वादातून दोन गटांनी एकमेकांवर शस्त्र चालविले. या घटनेत एक युवक गंभीर जखमी झाला. रात्री ८.३० वाजता दोन्ही गट एकमेकांसमोर आले. त्यांनी धारदार शस्त्राने वार करून एका युवकाला गंभीर जखमी केले.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी परिसरात खुनाची घटना झाल्यामुळे नागरिक दहशतीत आहेत. जखमीवर रात्री उशिरापर्यंत मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते. पाचपावली पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.