विदर्भ स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील अनिस खानने पटकाविला प्रथम क्रमांक #chandrapur #Nagpur #Vidharbh #Korpana


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- अत्याधुनिक व डिजिटल कार्य प्रणालीमुळे देशातील तरुणाई शरीर सौष्ठवावर कमालीचे दुर्लक्ष करताना दिसत आहे. सामाजिक उपक्रमात अग्रणी, वीरमाता जिजाऊ बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था यांच्या सौजन्याने नागपुरात विदर्भ स्तरीय भव्य अशी शरीर सौष्ठव स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली होती.

  सोमवार 16 जानेवारी रोजी स्थानिक सुरेश भट ऑडिटोरियम ग्रेट नगर रोड नागपूर येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली. यात राज्यातील अनेक ठिकाणाहून आपल्या शरीराचे प्रदर्शनीकरण करण्यासाठी युवक वर्ग आला होता. यात प्रथम येणाऱ्या स्पर्धकास फुल एचडी फोटोशूट, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट प्रत्येक स्पर्धकास, तीन महिन्याची फ्री ट्रेनिंग मिस्टर युनिव्हर्स किशन तिवारी सर यांच्याकडून देण्यात येणार होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शहर असो अथवा ग्रामीण भाग शारीरिक व्यायामाला मानवी जीवनात महत्त्व असून, विविध आजारापासून आपला बचाव करण्यासाठी दररोजच्या शारीरिक कसरतीला व योगाभ्यासाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे.

विभागीय स्तरावरील शरीर बिल्डींग स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील अनीस खान याने सर्वोत्कृष्ट सुधारितचा किताब पटकावला. वीरमाता जिजाऊ बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था यांच्या सौजन्याने विद्यमाने नागपूर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 100 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. नागपुरात झालेल्या या शरीर सौष्ठव स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर या शहरातील तरुण अनिस खाने कमालीचे यश संपादन केले आहे. २ वेळा "चंद्रपूर श्री"चा मान पटकावणाऱ्या अनिस खानने विदर्भ स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत सुद्धा प्रथम क्रमांक पटकावीत भव्य दिव्य असे यश संपादन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या