Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

धानोली (तांडा) ग्रामपंचायतीने मिळविले आय. एस. ओ मानांकन


कोरपना:- तालुक्यातील माणिकगड पहाडालगत नक्षलग्रस्त डोंगराळ व दुर्गम भागात असलेल्या धानोली (तांडा) ग्राम पंचायतीने आय एस ओ नामांकन पटकाविले आहे. हा बहुमान पटकाविणाऱ्या तालुक्यातील नवीन आर्थिक वर्षातील पहिली ग्राम पंचायत ठरली आहे.
यापूर्वी या ग्राम पंचायतीला अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. 

धानोली ही अतिदुर्गम भागातील विकसनशील ग्राम पंचायत असून येथे वर्षभर बरेच लोक उपयोगी उपक्रम राबविले जातात. १८ जानेवारी रोजी  ग्राम पंचायत धानोली  येथे आय एस ओ नामांकन सोहळा पार पडला . त्यात ग्राम पंचायतीला गौरविण्यात आले. 

याप्रसंगी धानोली ग्राम पंचायत सरपंच वैशाली पेंदोर, उपसरपंच ओमराज पवार , सदस्य वंदना मडावी, कविता जाधव , सुदर्षण आडे, गंगाधर राठोड, सीमा कोटणाके, यादव किंनाके, ज्योतिका गेडाम , सुमन मंगाम आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले.तालुक्यातील इतर ग्राम पंचायतीने धानोली ग्राम पंचायत चा आदर्श घ्यावा. तसेच गाव विकासासाठी कार्य करावे असे उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत