वन अकादमीच्या प्रशिक्षणार्थी वनधिकाऱ्यानी जाणून घेतला चंद्रपूरचा गोंडकालीन इतिहास #chandrapur


वन अकादमी व इको-प्रोचा संयुक्त उपक्रम


चंद्रपूर:- इको-प्रो व वन अकादमी, चंद्रपूर यांच्या वतीने वन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी वनाधिकारी यांचा चंद्रपूर किल्ला परकोटावरून हेरीटेज वॉक आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक स्थळाना भेटि देत गोंडकालीन इतिहास जाणून घेतला.

चंद्रपूर शहरातील गोंडकालीन इतिहास जाणुन घेत परकोटावरून पदभ्रमण करीत अनेक स्मारकांना भेटी दिल्या.
इको-प्रो तर्फे किल्ला स्वच्छता अभियानानंतर सुरू करण्यात आलेल्या हेरीटेज वॉक या चंद्रपूर किल्ला परकोट व ऐतिहासिक स्मारक भेटीतून चंद्रपूरचा इतिहास पर्यटकांनासमोर ठेवला जातो. या उपक्रमात यंदा वन अकादमी मध्ये प्रशिक्षणार्थी असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल यांच्या बॅचसोबत वनाधिकारी यांनी सुध्दा सहभाग घेतला होता. यात प्रामुख्यान ताडोबाचे क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक नंदकिशोर काळे, वनअकादमीचे उप संचालक अविनाशकुमार, पियुषा जगताप, चंद्रपूरचे विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे आदी सहभागी झाले होते.

सर्वप्रथम पहाटे रामाळा तलाव येथे शहरातील विविध स्मांरकाच्या फ़ोटो प्रर्दशनी असलेल्या जागेवर ऐतिहासिक माहिती संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी करून दीली. त्यांनतर बगड खिडकी ते अंचलेश्वर गेटपर्यत किल्लावरून पदभ्रमण सुरु करण्यात आले. किल्ला परकोटा सोबत गोंडकालीन इतिहास, इको-प्रो चे स्वच्छता अभियानची माहिती जाणून घेत सदर पदभ्रमण अंचलेश्वर गेट लगत असलेले अंचलेश्वर मंदीर व गोंडराजे समाधीस्थळ येथे समारोप करण्यात आला. याठिकाणी गोंडराजे बिरशहा यांची समाधी व परिसरातील विविध गोंडराजे यांची समाधी विषयी माहीती तसेच अंचलेश्वर मंदिराची निर्मीती व शहराच्या गोंड़कालीन, मराठे-भोसले आणि नंतर ब्रिटिश काळातील इतिहास सुध्दा यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी पर्यटकांना सांगण्यात आला.

चंद्रपूर जिल्हा वाघ-वन्यप्राणी, जंगल याशिवाय ऐतिहासिक वारसा लाभलेल्या असल्याने चंद्रपरात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासारखे आहे. याविषयी अधिक प्रचार प्रसार झाल्यास चंद्रपूर शहरातील वैभवशाली व गौरवपूर्ण इतिहासांची माहिती पर्यटकांना मिळू शकेल, अशी प्रतिक्रीया उपस्थित वनाधिकारी यांनी दिली.

इको-प्रो ने सातत्यपुर्ण केलेली स्वच्छता व पर्यटन विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न उल्लेखनीय असून, यासाठी सर्व स्तरातुन प्रयत्न झाल्यास चंद्रपूरची नवी ओळख निर्माण होऊ शकते, अशी भावना सहभागी पर्यटकांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत