Top News

संजीवनी फाऊंडेशन नागपूर विभागाच्या चंद्रपूर महानगर कार्यक्रमाची कार्यकारीणी जाहीर #chandrapur


उपाध्यक्षपदी पल्लवी गेडाम तर साक्षी धंदरे विस्तार व संघटन विभाग अध्यक्षपदी निवड


चंद्रपूर:- दिनांक १४ जानेवारीला संजिवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चेअरमन डॉ. ज्ञानेश्वर वसंतराव सापन यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश बसवेश्वर हजारे अध्यक्ष, क्रीडा विभाग तथा अध्यक्ष, नागपुर विभाग संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील सरदार पटेल महाविद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.‌ कुलदीप आर. गोंड, संजीवनी फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

यावेळी संजीवनी फाऊंडेशन चंद्रपूर महानगर व सरदार पटेल महाविद्यालय कार्यकारीणी नियोजन, संजीवनी फाऊंडेशन सामान्य ज्ञान स्पर्धेचे नियोजन, आगामी काळात घेण्यात येणाऱ्या संजीवनी फाऊंडेशन कार्यक्रमांचे नियोजन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. व संजीवनी फाऊंडेशन नागपूर विभागाच्या चंद्रपूर महानगर कार्यक्रमाची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.

संजीवनी फाऊंडेशन नागपूर विभागाच्या चंद्रपूर महानगर कार्यक्रमाची कार्यकारीणीच्या उपाध्यक्षपदी पल्लवी गेडाम तर विस्तार व संघटन विभाग अध्यक्षपदी साक्षी धंदरे हिची निवड करण्यात आली. 


अध्यक्ष म्हणून धनपाल चनकापुरे, सचिव कु. सुप्रिया नागोसे, खजिनदार कु. शालिनी निर्मळकर, सहसचिव गायत्री गेडाम, प्रवक्ता गौरव झाडे, कार्यक्रम व नियोजन विभाग अध्यक्ष कृषाली खंडायीत, क्रिडा विभाग अध्यक्ष शुभम गोंगळे, माहिती व जनसंपर्क विभाग अध्यक्ष जानवी माहुरपवार, साहित्य व सांस्कृतिक विभाग अध्यक्ष केतन सोयाम यांची नियुक्ती करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने