ध्येयासाठी मनात निश्चय करत समर्पित रहा, हमखास यश मिळेल #chandrapur


ना. सुधीर मुनगंटीवार यांचे विद्यार्थ्याना भावनिक आवाहन

देशगौरव नरेंद्र मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा २०२३’ चे उत्स्फूर्त प्रतिसादात थेट प्रक्षेपण


चंद्रपूर:- अंतर्मनाशी निश्चय बांधत ध्येयासाठी समर्पण करणारी माणसं समाजात खूप मोठी होतात; मी मोठा होवू शकतो हे आपल्या अंतर्मनाला सांगायला शिका आणि पूर्ण आत्मविश्वासाने ध्येयासाठी समर्पित व्हा हमखास यश प्राप्त होईल" असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ‘परीक्षा पे चर्चा २०२३’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चंद्रपूरमध्ये या कार्यक्रमाचे सर्वत्र थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ना. मुनगंटीवार विद्यार्थ्यांसमोर बोलत होते.

कार्यक्रमास राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगरा भाजपाचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा महामंत्री राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कसानगोट्टूवार, महामंत्री रवीजी गुरनुले, माजी उप महापौर राहुल पावडे,भाज युमो युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष विशाल निंबाळकर, महानगरचे युवा मोर्चा महामंत्री सुनील डोंगरे, प्रमोद क्षीरसागर, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पदाधिकारी यश बांगडे , राहुल पाल, कुणाल गुंडावार, पप्पू बोपचे, आकाश मस्के, रुपेश चहारे , स्नेहीत लांजेवार,मनीष पिपरे, सतीश तायडे,सत्यम गाणार, आकाश ठुसे, संजय निखार, युवा मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडावार , हिमांशू गाडेवार, गजू भोयर, स्वप्निल भोपेय, संजय पटले, संजय पटले प्रवीण उरकुडे, विकी मेश्राम, दीपक हूड, सचिन यामावार, विठ्ठलजी डुकरे, सचिन कोतपल्लीवार, संदीप आगलावे, दिनकरजी सोमलकर, रवी लोणकर, मयूर चहा रे, वासुदेव बेले, जयश्री आत्राम, मुग्धा खांडे , मनीषा महातव.
महानगरातील सर्व मंडल अध्यक्ष,सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी, विदयार्थी, विध्यार्थीनी, पालक उपस्थित होते.

ना मुनगंटीवार पुढे म्हणाले कि, सोशल मीडियाचा दुष्प्रभाव सध्या चिंतेचा विषय बनला असून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील याबाबत चिंता व्यक्त करत  मोबाईलच्या अतिरेकी नादापासून विद्यार्थ्यांनी स्वत:ला रोखावे असे आवाहन केले; याचा गांभीर्याने विचार करायला हवा. ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतात, हे फक्त भारतातच होऊ शकते ही बाब आपल्यासाठी गौरवास्पद आहे. देशगौरव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळेच जगातील प्रत्येक देश भारताकडे कुतूहलाने बघतो आहे, कोरोनावरील लस व योग्य अंमलबजावणी हे जागतिक पातळीवर भारताचे मोठे यश आहे हे देखील ना. मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले.

 विद्यार्थ्यांनी परिश्रम करून यश मिळवून  मोदीजींचे हात बळकट करावे असे आवाहन देखील ना.मुनगंटीवार यांनी केले. ते पुढे म्हणाले, मुलांची प्रगती हा आई वडिलांना परमोच्च आनंद देणारा क्षण असतो, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचा "ऑटोग्राफ" कुणी मागेल एव्हढे यशस्वी व्हा,  असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
https://nm-4.com/5tpHF5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत