Top News

गुरुदास कामडी यांचा उपक्रमशील भूगोल शिक्षक पुरस्कार २०२२ ने सन्मानित #chandrapur


चंद्रपूर:- भूगोल प्रज्ञाशोध केंद्र नवी मुंबई यांच्याद्वारे दरवर्षी उपक्रमशील भूगोल शिक्षक पुरस्काराचे व भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन दरवर्षी करण्यात येत असते .या वर्षी ही परिक्षा दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ ला आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत सन्मित्र सैनिक विद्यालयातील वर्ग सहावी ते दहावीच्या १४० विद्यार्थ्यांना सन्मित्र सैनिक विद्यालयाची भूगोल विषय शिक्षक व सहाय्यक शिक्षक गुरुदास कामडी यांनी १४० विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलेले होते.
🖼️

या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा परीक्षेमध्ये सन्मित्र सैनिक विद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी आर्यन धोंडसे यांनी सुवर्णपदक तर इयत्ता दहावीचा विद्यार्थी आदित्य कष्टी याने रौप्यपदक प्राप्त केलेले आहे.

गुरुदास कामडी सन्मित्र सैनिक विद्यालय चंद्रपूर येथे गेल्या २२ वर्षापासून सहाय्यक शिक्षक या पदावरती कार्यरत असून इयत्ता सहावी ते दहावी या वर्गांना ते भूगोल विषयाचे अध्ययन-अध्यापनाचे कार्य करित आहेत. भूगोल विषयाचे अध्ययन अध्यापन कार्य करत असताना विविध उपक्रम त्यांनी विद्यालयांमध्ये राबवलेले आहेत. क्षेत्रभेट, पावर पॉइंट प्रेझेंटेशन, युट्युब चॅनेल, या माध्यमातून त्यांनी भूगोल विषयासंदर्भात अनेक उपक्रम राबवलेल्या आहेत. त्यांच्या कार्याबद्दल भूगोल प्रज्ञाशोध केंद्र नवी मुंबई यांच्याद्वारे सन २०२२ चा भूगोल उपक्रम शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याची घोषणा अरुण देसले, संचालक, भूगोल प्रज्ञा शोध केंद्र नवी मुबंई यांनी दिनांक १४ जानेवारी २०२३ ला भूगोल दिनाच्या पर्वावर केली आहे.

गुरुदास कामडी यांना यापूर्वीही सन्मित्र सैनिकी विद्यालयाचा २०१० बेस्ट टीचर अवार्ड , २०११ मध्ये महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, २०१२ मध्ये दैनिक लोकशाही वार्ता आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. २०२२ मध्ये रोटरी क्लब बल्लारपूरच्या वतीने नेशन्स बिल्डर्स अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. गुरुदास कामडी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहीले आहेत.

वर्तमानात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य म्हणून कार्य करीत आहेत. गुरुदास कामडी यांनी भूगोल विषयाचे विभागीय स्तर व जिल्हा स्तरावर तज्ञ मार्गदर्शक .वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे. सर्व शिक्षा अभियान व पुर्नरचित अभ्यासक्रमाचे
जिल्हास्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून सुद्धा काम केलेल्या आहे .त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून २६ जानेवारी २०२३ ला सन्मित्र सैनिक विद्यालयाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त सन्मित्र मंडळाचे सचिव अँड. निलेश चोरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी सन्मित्र मंडळाचे उपाध्यक्ष निळकंठराव कावडकर, सदस्य विजयराव वैद्य ,सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या प्राचार्या अरुंधतीताई कावडकर ,कमांडन्ट सुरेंद्रकुमार राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार गुरुदास कामडी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने