चंद्रपूर:- प्रवाशांना घेऊन हैदराबादकडे निघालेली ट्रॅव्हल्स विरुर- धानोरा मार्गावर पलटली.यात दोघांचाचा मृत्यू झाला असून सतरा गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. ही घटना शुक्रवारचा मध्या रात्री घडली. जखमींना उप विरुर,राजुरा,चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. जखमींच्या आकडा वाढण्याची शक्यता आहे. अति गंभीर असलेल्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती पुढे येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात येणाऱ्या विरूर- धानोरा मार्गाने प्रवाशांना घेऊन निघाली होती.चालकांचे निययंत्र सुटल्याने ट्रॅव्हल्स पलटली. यात यांचा मृत्यू झाल्याची माहिती असून सतरा ते अठरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळतातच विरूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमींना बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. काही जखमींना वीरुर ,काहीना राजुरा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अति गंभीर असलेल्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवल्याची माहिती आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत